आयु. माणिक वामनराव रामटेके यांना बेस्ट टीचर नॅशनल अवॉर्ड ने सन्मानित
-------------------------------------
दिनांक 9 ऑक्टोंबर ला विद्यार्थी प्रिय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य व शब्दगंध समूह प्रकाशन औरंगाबाद आयोजित
-------------------------------------
शिक्षक आपल्या शैक्षणिक कार्यात अध्यापनात नवनवीन बदल करून बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या शैक्षणिक अध्यापन कार्यात बदल करीत असतात. आजच्या डिजिटल युगात हे नवनवीन परिवर्तन घडवून आणत असतात. ते आपल्या शाळेत विविध उपक्रम राबवीत असतात. वेळ प्रसंगानुसार आलेले सामाजिक कामेही उत्कृष्टतेने पार पाडत असतात. विद्यार्थ्यांची मुलांची शैक्षणिक प्रगती विषयी नवनवीन तंत्राचा वापर करून अध्यापनात बदल घडवून आणत असतात. सोबतच विविध शैक्षणिक उपक्रम राबवीत असतात. असे विविध कार्य ते करीत असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत त्यांच्या कार्याचे गुणगौरव करणाऱ्या विविध सामाजिक संस्था आहेत. अशा संस्था शिक्षकांचे शैक्षणिक विषयक त्यांच्या शैक्षणिक कार्याचे ऑनलाईन आढावा घेऊन त्यांना सन्मानाने सन्मानीत करण्याच्या हेतूने व त्यांच्या शैक्षणिक कार्य वास्तविक कौतुकास्पद स्तुत्य आहे. आपल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, साहित्यिक, कायदेविषयक, सेवा, आरोग्य, क्रीडा, शासकीय, प्रशासकीय ह्या विविध उल्लेख कार्याबद्दल या संस्थेद्वारा
आयु. माणिक वामनराव रामटेके नगर परिषद सावनेर आस्थापणेत असलेली शाळा न. प. अभ्यंकर प्राथमिक शाळा, सावनेर जि. नागपूर यांना
बेस्ट टीचर नॅशनल अवॉर्ड 2022 पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश यात होता. हा पुरस्कार मा. रूपाली पवार (सिने अभिनेत्री) अरुण घोडेस्वार पर्यावरण मित्र व सुमित राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . या कार्यक्रमाचे आयोजक मा. संदीप दा. त्रिभुवन विद्यार्थी प्रिय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य व शब्दगंध समूह प्रकाशन औरंगाबाद व आम्रपाली प्रकाशन बीड यांचे द्वारा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.






No comments:
Post a Comment